हॉटेल वेटरच निघाला चोरटा : लॉकर फोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबवला

जळगाव : शहरातील गणेश कॉलनीत खॉजामियॉ चौकातील हॉटेल गायत्री येथील वेटरने हॉटेमधील लॉकर फोडून तोडून एक लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
शरद प्रकाश पवार (29, रा.शाहु नगर, नुरानी मशिदीसमोर, जळगाव) यांचे गणेश कॉलनीतील खाजमिया चौकात हॉटेल जयश्री नावाचे हॉटेल आहे. हॉटेल चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हॉटेमध्ये ओम निलेश्वर चतुर्वेदी (21, रा.सतना मध्य प्रदेश, ह.मु.गणेश कॉलनी, जळगाव) हा वेटर म्हणून कामाला होता. गुरुवार, 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान वेटर ओम चतुर्वेदी याने हॉटेलच्या केबिनमधील लॉकर तोडून एक लाख 5 हजार रुपयांची रोकड आणि 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत शरद पवार यांनी शुक्रवार, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर ओम निलेश्वर चतुर्वेदी विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.