A compensation of one lakh 80 thousand was extended from a closed house in Shingaiit village जामनेर : हॉटेल व्यावसायीकाच्या शिंगाईत येथील बंद घरात चोरट्यांनी हात की सफाई करीत एक लाख 80 हजारांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
प्रवीण दिलीप पाटील (37, शिंगाईत) हे हॉटेल व्यावसायीक असून शुक्रवार, 11 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते सोमवार, 14 नोव्हेंबर सकाळी 7 वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने, मंगलपोत, कानातील दागिने असा एकूण एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवीण पाटील यांनी जामनेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक मोहिते करीत आहे.