तैमूरला जन्म दिल्यानंतर बॉलिवूडमधील अभिनेत्री करीना कपूर ही सध्या एकाहून एक नव्या लूकमध्ये नजरेस पडत आहे. गर्भवती असतांनाही करीनाने तिचा ड्रेसिंग सेन्स कायम ठेवला होता.
त्याही काळात तिने अनेक फॅशनचे कपडे घालून चाहत्यांचे लक्ष वेधले होते. बाळंतपणानंतर करीना एक प्रकारे हॉट मम्मी म्हणून समोर आली आहे. नुकतेच करीना मलेशिया येथे एका दुकानाच्या उद्घाटनाला गेली, तेव्हा काढलेले फोटो तिने इन्टाग्राफमध्ये शेयर केले आहेत. ज्यात करीना ब्लॅक ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे. डस्टी गोल्डन आणि ब्लॅक ऑफ शोल्डर तसेच लाँग स्लीट स्लीव्स असा हा ड्रेस परिधान करून करीनाने आपला ग्लमर लूक कायम राखल्याचे दाखवून दिले आहे.