मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत हॉरर सिनेमाचा ट्रेंड आणणारे आणि रुजवणारे निर्माते तुलसी रामसे यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. पुराना मंदिर, तहखाना, वीराना, बंद दरवाजा हे त्यांचे भयपट खूप गाजले. झी हॉरर शो ही मालिकाही तुलसी रामसेंनी दिग्दर्शित केली होती. तुलसी रामसे यांना छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं .
गोविंद यादव यांच्यासोबत तुलसी रामसे अनेक वर्षे काम करत होते. तुलसी रामसे यांना सहा भाऊ आहेत. त्यांचे चित्रपट रामसे ब्रदर्स या नावानेच चालत. त्यांच्या सिनेमात अॅक्शन, रोमान्स, गाणी आणि सेक्स असा सगळा मसाला असे. त्यामुळेच प्रेक्षकांना त्यांचे चित्रपट आवडत. हॉरर सिनेमांचा ट्रेंड रामसे बंधूंनी रुजवला.