होतकरु विद्यार्थ्यांना मदत करणे आपले कर्तव्य

0

कोरेगाव भीमा । गावातील होतकरु आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या कामासाठी ग्रामपंचायतीकडून मदत केली जाईल, असे आश्‍वासन सरपंच संगिता गोविंद कांबळे यांनी दिले. कोरेगाव भीमा येथील सुयश प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सरपंच संगिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी 55 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अबालवृद्ध ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपसरपंच कल्पना गव्हाणे, मराठी पत्रकार परिषदचे राज्य कोषाअध्यक्ष शरद पाबळे, के. डी. गव्हाणे, विनोद गव्हाणे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

आम्ही सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आरोग्य आणि शिक्षण याकडे लक्ष देत आहोत. तरी, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे संगीता कांबळे यांनी सांगितले. सुयश प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष विनोद गव्हाणे यांनी प्रास्तविक केले. मुख्याध्यापिका संगिता कैलास धुमाळ यांनी स्वागत तर लहू चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.