होमिओपॅथिक आर्स अल्ब थर्टी प्रोटेन्सीच्या गोळ्यांचे वाटप

0

नवापूर: संपुर्ण जगात कोरोना विषाणु महामारीमुळे जग हादरले आहे. यावर कोणतेही औषध आतापर्यत तयार झाले नाही. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ आयुष्य विभागाने कोरोणा साथीच्या पार्श्‍वभूमीवर होमिओपॅथिक मेडिसिन प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिकारक शक्तीवर्धक म्हणून सुचवले आहे. त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री साई सेवा होमिओपॅथी क्लिनिकचे संचालक डॉ. आशुतोष वाडीले यांच्यातर्फे तहसीलदार राजेंद्र नजन व तहसील कार्यालयाचे कर्मचारी,पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व सर्व पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधवांना सामाजिक बांधिलकीच्या हेतूने रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी होमिओपॅथिक आर्स अल्ब थर्टी प्रोटेन्सीच्या गोळ्यांचे सर्व तहसील कर्मचारी,पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधवाना विनाशुल्क डॉ.आशुतोष वाडीले यांनी

गोळ्यांचे वाटप केले.

भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ आयुष विभागाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथीक आर्सेनिक अलबम 30 हे प्रतिबंधात्मक औषध सुचविलेले आहे. हे औषध माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच श्वसनाचे विकार व फुफ्फुसांच्या विकारावर काम करते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करू शकते. डॉ.आशुतोष वाडीले नवापूर शहरात गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून यशस्वीरीत्या होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहेत. डॉ .वाडीले यांनी भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ आयुष विभागाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथीक आर्सेनिक अलबम 30 प्रतिबंधात्मक मेडिसिन सुचविलेले आहे. हे मेडिसिन अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी डॉ.आशुतोष वाडीले यांना संपर्क करण्याची माहिती सुनील पवार यांनी दिली.