होळनांथे परीसरात बिबट्याचा वावर

0

होळनांथे । शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील भाजपाचे युवामोर्चा चे माजी अध्यक्ष नितीनसिंह राजपूत यांच्या होळनांथे परिसरात उसाच्या शेतात ऊसतोड कामगारांना 13 डिसेंबर रोजी ऊसाच्या शेतात बिबट्या दिसल्याने मजूर व शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत मालक नितीनसिंह राजपूत यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचार्‍यांशी संपर्क केला असता खात्री करून घेण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी खैरनार व वाघ यांनी शेतात जाऊन बिबट्याचे ठसे घेऊन गेले आहेत. तरी बिबट्याचा वावर परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. संबधीत यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेही कोणाचा जीव गमवण्या आगोदर त्वरीत दखल घ्यावी, असे भाजपाचे युवा नेता नितीनभाऊ राजपूत सह परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.