मुंबई : ह्रतिक रोशन आणि सु्झैन खान यांनी लग्नाच्या १७ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी वेगळे होण्यामागचे कारण चाहत्यांच्या कधी पोहचू नाही दिले. मात्र, अजूनही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अशातच ह्रतिकने सुझैनसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून त्यांनी पुन्हा एकत्र येण्याची आशा व्यक्त केली आहे.
ह्रतिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याची मुले रेहान आणि रिधान दिसत आहेत. ‘माझी खूप जवळची मैत्रीण सुझैन, जी माझा आणि मुलांचा फोटो क्लिक करत आहे. हा क्षण असा आहे, जो माझ्या मुलांची गोष्ट सांगतोय. हे त्यांचं जग आहे, जे वेगळं झालंय. आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो. हे आपल्याच घरापासून सुरू झालंय. आपलं प्रेमळ जग आपण पुन्हा सुरू करू शकतो’, असे ह्रतिकने या पोस्टवर लिहिले आहे. ह्रतिकच्या या पोस्टवर सुझैनने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘होय, हे आपणच आहोत. नेहमी सोबत आणि एकमेकांसोबतच राहू’.