१०० कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा

0

जळगाव: शहरातील विकास कामांकरीता विविध योजने अंतर्गत शासनाने वितरीत केलेल्या निधीतून करण्यात येणार्‍या कामांना शासनाने स्थगिती दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. 100 कोटींपैकी 42 कोटींच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरु केली होती. मात्र शासनाने विकास कामांकरीता दिलेल्या निधीतून करावयाच्या कामांना स्थगिती दिली होती. त्यामुळे त्यामुळे कामांना ब्रेक लागला होता. दरम्यान,शासनाने स्थगिती उठविली असल्याते आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. शासनाने स्थगिती उठविल्यामुळे आता विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप नेत्यांनी शहराचा वर्षभरात कायापालट करु असे आश्‍वासन दिले होते.केंदात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे जळगाव मनपात सत्ता आल्यास निधा देण्याचे आश्‍वासन देण्यात आल्याने जळगावकरांनी भाजपला कौल दिला.मनपात सत्तांतर होवून भाजपची एकहाती सत्ता आली.त्यामुळे शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून शहरात गटारी,नाल्यांची संरक्षण भिंत,मोकळ्या जागांचा विकास,जाँगींग ट्रक,ओपन जिम असे कामे केली जाणार होते.मात्र शासनाने 100 स्थगिती दिल्यामुळे 100 कोटींतून एक रुपयाही खर्च झालेला नव्हता. आता मात्र स्थगिती उठविण्यात आली आहे.

निविदा प्रक्रियेबाबत संभ्रम

जळगाव शहराच्या विकासासाठी शासनाकडून महानगरपालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून विकासकामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राधिकृत करण्यात आले आहे. 100 कोटीतून 42 कोटींच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. त्याच कालावधीमध्ये शासनाने स्थगिती दिली होती. मात्र निविदा प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्थगिती उठविल्यानंतर ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शासनाने स्थगिती उठविली असली तरी निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कार्यादेश देण्यापर्यंतच्या कार्यवाहीचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत सादर करावा असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार: महापौर

जळगाव शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 100 कोटींच्या निधीची स्थगिती शासनाने उठविली आहे. त्यामुळे शासनासह निधीसाठी पाठपुरावा करणारे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचे आभार. शासनाने स्थगिती उठविल्यामुळे शहरातील 42 कोटींची विकासकामे आता होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांची बुधवार 21 रोजी भेट घेणार असल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.

42 कोटींच्या निविदेला ग्रीन सीग्नल

शहराच्या विकासकामांसाठी मिळालेल्या 100 कोटींच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. 100 कोटींतून 42 कोटींच्या कामांची निविदा काढून 30 डिसेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या होत्या .मात्र शासनाने विकास कामांकरीता दिलेल्या निधीतून करावयाच्या कामांना स्थगिती दिली होती.दरम्यान,स्थगिती उठविण्यात आल्याने मार्ग मोकळा
झाला आहे.