१० पैकी ९ भारतीय म्हणतात पत्नीने केले पाहिजे पतीच्या आज्ञेचे पालन

 १० पैकी ९ भारतीय पत्नीने नेहमी आपल्या पतीची आज्ञा पाळली पाहिजे या कल्पनेशी सहमत असल्याचे ताज्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारतीय लोक कुटुंब आणि समाजात लिंग भूमिकेकडे कसे पाहतात याचा अभ्यास या सर्वेक्षणात केला गेला आहे.

 

 29,999 लोकांपैकी जवळपास दोन तृतीयांश लोक या भावनेशी पूर्णपणे सहमत आहेत.हे सर्वेक्षण 2019-2020 च्या उत्तरार्धात कोरोना येण्यापूर्वी केले गेले. हा सर्व्हे बुधवारी, 2 मार्च रोजी प्रसिद्ध झाले.