१२ रेशन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

0

नवापूर:तालुक्यात लाँकडाऊनच्या काळात स्वस्त धान्य दुकानदाराकडुन सुरळीत वाटपाबाबत लक्ष दिले जात आहे. ज्या रेशन दुकानांच्या तक्रारी येत होत्या. त्यांची चौकशी करुन १८ दुकानदारांची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविल्या. नंतर १२ दुकानांवर कारवाई केली आहे. यात नवापूर शहरातील एका दुकानाचा समावेश आहे तर काही दुकानांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही दुकाने रद्द करण्यात आली आहे. धान्य वाटपाबाबत पुर्णपणे लक्ष दिले जात असल्याचे तहसीलदार सुनिता जऱ्हाड यांनी सांगितले.