मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य ते भीक होती असे वादग्रस्त उद्गार काढले होते. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असेही वक्तव्य केले आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आता खुद्द कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तिने म्हंटले आहे की, मी दिलेल्या मुलाखतीत जे काहीही बोलले ते सर्व माहितीच्या आधारावर बोलले आहे.
स्वातंत्र्यासाठी पहिले संघटित युद्ध हे १८५७ मध्ये लढले गेले. मला १८५७ ची माहिती आहे पण १९४७ मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहित नाही. त्यामुळे या मुद्यावर मला माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन. कृपया मला याबाबत माहिती देण्यास कुणी मदत करा