नवी दिल्ली- १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणी न्यायालयाने आज ३४ वर्षांनंतर एकाला फाशीची तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आज दिल्लीतील एका न्यायालयाने हत्येप्रकरणी दोषी ठरवत नरेश सहरावतला जन्मठेप तर यशपाल सिंहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मागील आठवड्यात न्यायालयाने याप्रकरणाशी संबंधित सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आपला आदेश राखीव ठेवला होता.