नवी दिल्ली: आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या आहेत. दुपारी १ वाजेपर्यंत देशभरात ३९.८५ टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक पश्चिम झारखंडमध्ये ५२.८९ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल बिहार ३६.२०, हिमाचल प्रदेश ३४.४७, मध्य प्रदेश ४३.८९, पंजाब ३६.६६, उत्तर प्रदेश ३६.३७, पश्चिम बंगाल ४७.५५, चंदीगढ ३५.६० टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतर उन्हामुळे मतदारांची संख्या कमी झाली असून 4 वाजेनंतर पुन्हा गर्दी होऊ शकते.