२०१९ ची निवडणूक भाजपने जिंकली तर देशाचे भले होईल-अमित शहा

0

नवी दिल्ली-दिल्लीत आजपासून भाजपचे राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. यावेळी बोलतांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसवर टीकेचा भडीमार केला. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे, नेतृत्व असलेला एकही चेहरा कॉंग्रेसकडे नाही असे म्हणत अमित शहा यांनी २०१९ ची निवडणूक ही एक लढाई आहे. ती भाजपाने जिंकली तरच देशाचे भले होईल असे सांगितले. यावेळी त्यांनी तरुण वर्गाने आणि गरीबांनी भरभरून मतदान करावे असेही आवाहन त्यांनी केले.

पानिपतच्या लढाईचे उदाहरण अमित शाह यांनी दिले. पानिपतची लढाई मराठे हरले आणि देश २०० वर्षे मागे गेला. आजची वेळ तशीच अटीतटीची आहे. तुम्ही नेता आणि नेतृत्त्व नसलेल्या पक्षाला मतदान केलेत तर देश पुन्हा काही वर्षे मागे जाईल. त्यांनी (काँग्रेस) देशावर ७० वर्षे राज्य केले मात्र देशाची प्रगती काहीहीह केली नाही अशीही टीका शाह यांनी केली. देशाचा विकास, देशाचे गौरव हे गेल्या पाच वर्षात वाढले आहे. २०१४ मध्ये भाजपाकडे ६ राज्यांचे सरकार होते. आता २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपाकडे १६ राज्यांची सत्ता आहे. हा पक्ष गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता पुन्हा एकदा देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना निवडून द्या असे आवाहनही अमित शाह यांनी केले.