मुंबई-आज देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. तीन राज्यात भाजपला मात देत कॉंग्रेसने आघाडी मिळविली आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कॉंग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्ष मागे-पुढे होतांना दिसत आहे. दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचे निकाल हे बदलला सुरुवात झाली असल्याचे दाखवून देत असून २०१९ मध्ये देखील भाजपची अशीच स्थिती असणार आहे असे भाकीत व्यक्त करत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला टोला लगावला आहे.
भाजप नेते अतिशय हीन दर्जाची वागणूक राहुल गांधी यांना देतात, मात्र हे विजय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे विजय असून भाजपसाठी ते चपराख आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.