नवी दिल्ली- ४८ वर्ष सत्ता करत गरिबी हटविण्याचा नारा देणाऱ्या सरकारने प्रत्यक्ष गरिबी हटविण्यासाठी उपाययोजना केल्या नाही. मात्र मोदी सरकारने ४८ महिन्यात गरिबी हटविण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्य केले आहे. २०३० पर्यंत देशातून गरिबीचे समूळ उच्चाटन होईल व भारत देश गरिबांचा देश म्हणवला जाणार नाही असे भाजपने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
काँग्रेसवर आरोप करतांना भाजपने ४८ वर्षापर्यंत नामदारांनी फक्त घोषणाबाजी केल्या मात्र कामदारांनी ४८ महिन्यात करून दाखविले आहे असे सांगितले आहे.
48 साल से अधिक समय तक नामदार केवल 'गरीबी हटाओ' का नारा देते रहे और 48 महीने में कामदार ने कर दिखाया। pic.twitter.com/yVadwxKuJq
— BJP (@BJP4India) September 26, 2018