२० दिवसांपूर्वी वर्तविलेले राहुल गांधींचे ‘ते’ भाकीत खरे ठरले

0

नवी दिल्ली: देशात कोरोनाग्रास्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगात सर्वाधिक रुग्णांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका, ब्राझीलपाठोपाठ भारताचा क्रमांक आहे. मागील २० दिवसात भारतात तब्बल १० लाख नवीन रुग्ण आढळले आहे. भारतातील कोरोनाग्रास्तांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आजच्या स्थितीत देशात २० लाख २७ हजार ७४ रुग्णांची नोंद झाली आहे. यावरूनच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “करोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला आहे. परंतु मोदी सरकार गायब आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ट्वीटरवरून राहुल गांधींनी सरकारला लक्ष केले आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी २० दिवसांपूर्वी वर्तविलेले भाकीत खरे ठरले आहे. १७ जुलैला ट्वीटकरून राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाग्रास्तांची संख्या १० ऑगस्टपर्यंत २० लाखांपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज खरा ठरला आहे. आज ७ ऑगस्टलाच भारतात २० लाख रुग्णांची नोंद झाली आहे. १७ जुलैपर्यंत १० लाख रुग्णांची नोंद झाली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी सरकारने कोरोनाचा अटकाव करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत असे म्हटले होते.

देशात कोरोनाग्रास्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना मोदी सरकार कोरोनावर मात करण्यास अपयशी ठरल्याचे आरोप राहुल गांधींनी केले आहे.