मुंबई : बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंग यांच्या लग्नाला अवघे काहीच दिवस राहिले आहेत. नोव्हेंबर १४ आणि १५ तारखेला या जोडीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. नंदी पूजा, हळद या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिका आणि रणवीरच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. नुकतंच दीपिकाने मंगळसूत्र खरेदी केलं आहे आणि त्याची किंमत सुमारे २० लाख रुपये इतकी आहे.
मुंबईतल्या अंधेरी इथल्या एका दागिन्यांच्या दुकानातून तिने ही खरेदी केली आहे. दीपिकाने लग्नात परिधान करण्यासाठी तब्ब्ल एक कोटी रुपयांचे दागिने खरेदी केले असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे दीपिका खरेदी करताना एका तासासाठी इतर ग्राहकांसाठी हे दुकान बंद करण्यात आलं होतं.
दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे. १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने विवाह होईल. रणवीर सिंग सिंधी आहे. १६ तारखेला सर्व पाहुणे मायदेशी परततील. बॉलिवूडमधल्या आपल्या मित्र परिवारासाठी दोघांकडून एक डिसेंबरला मुंबईत भव्य स्वागतसोहळा आयोजित केला जाईल अशी चर्चा आहे.