नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक समाप्त होण्याचे दोन टप्पे बाकी आहेत. सध्या लोकसभा निवडणूकीमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशातील राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे, दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते पंतप्रधानपद कोणाला मिळणार? याच्या चर्चेत गुंग आहे. या संदर्भात समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अखिलेश यादव यांना विचारण्यात आले. त्यांचे उत्तर गुलदस्त्यातच ठेवले आहे.
पंतप्रधानपदासाठी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना पाठिंबा देणार का? असा प्रश्न विचारण्यात अखिलेश यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, सर्वांना माहितच आहे, पंतप्रधानपदासाठी आपला कुणाला पाठिंबा आहे. विविध पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मायावती यांनी प्रयत्न करावा. तरी पंतप्रधानपदासाठीचा निर्णय २३ मे रोजीच्या निकालानंतर घेण्यात येईल, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.
पंतप्रधान उत्तर प्रदेशातून व्हावा, असे सांगताना वाराणसीतून नको, वाराणसीवाल्याने देशाचे मोठे नुकसान केल्याचा टोला देखील अखिलेश यांनी मोदींना लगावला. दरम्यान मायावती यांना पाठिंबा किंवा महायुतीसंदर्भातील निर्णय चर्चा करून घेणार असल्याचे अखिलेश यांनी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा कुणाला द्यावा याचा निर्णय देखील निकालानंतरच होईल
असेही अखिलेश यांनी सांगितले.
निवडणुकीचे अद्याप दोन टप्पे बाकी आहेत. त्यापूर्वी भाजप काय रणनीती करते हे देखील पाहणे गरजेचे आहे. पंतप्रधान एका सभेत म्हणाले की, समाजवादी पार्टीने काँग्रेसशी हातमिळवणी करत मायावतींना धोका दिला आहे. परंतु, आपण मायावती यांच्यासोबत आहे. तसेच पंतप्रधान होण्याचा आपला काही इरादा नसून पंतप्रधान करण्यासाठी आम्ही उभे राहु, असेही अखिलेश यांनी म्हटले.