२५ लाख डॉलर्सला निक-प्रियांकाने विकले लग्नाच्या फोटोंचे हक्क

0

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा निक जोनाससोबत डिसेंबरमध्ये लग्नबेडीत अडकणार आहे. तिच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो मिळविण्याकरता माध्यमांमध्येही चढाओढ पाहायला मिळते. हीच चढाओढ पाहून निक-प्रियांकाने त्यांच्या लग्नाचे फोटोंचे हक्क तब्बल २५ लाख डॉलर्सला विकले आहेत.

त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलिकडेच प्रियांकाचे ‘ब्रायडल शॉवर’ आणि ‘बचलरेट पार्टी’ आटोपली. या कार्यक्रमाचे फोटोदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. प्रियांका आणि निक २ डिसेंबरला जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत.

माहितीनुसार, त्यांच्या लग्नाचे फोटो एका आंतरराष्ट्रीय मॅक्झिनवर झळकणार आहेत. यावर अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.