‘२ किंवा ३ मार्च’ला लोकसभेची अधिसूचना निघणार-रावसाहेब दानवे

0

धुळे- लोकसभा निवडणुकांची अधिसूचना २ किंवा ३ मार्चला निघणार आहे,’ त्यामुळे आतापासून कामाला लागा अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिल्या. धुळ्यात नगरसेवकांशी बोलताना रावसाहेब दानवेंनी ही माहिती दिली.

निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत घोषणा होण्याआधीच दानवेंच्या या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा करण्याआधी दानवेंना चाहूल कशी लागली, असा सवाल उपस्थित झाला आहे.