अहमदनगर: घोगरगाव येथील श्रीगोंदा तालुक्यातील ३० वर्षीय विवाहितेवर नातेवाईकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांना अटक केली आहे.
महिलेला मारहाण करत या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या पीडितेने घरी आल्यावर झालेला प्रकार हातवारे करून घरच्यांना सांगितला. याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कमलेश उगलेविरोधात गुन्हा दाखल केला.