४ सरकारी बँकांचे होणार विलीनीकरण

0

नवी दिल्ली । केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्रात मोठी सुधारणा करण्यासाठी लवकरच अभिनव पाउल टाकण्यासाठी काम सुरु केले आहे. त्यानुसार चार सरकारी बँकांचे विलीनीकरण करून एक मोठी बँक स्थापन करण्यात येणार आहे. वित्त मंत्रालयातील अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयडीबीआय, बँक ऑफ बरोडा, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या त्या चार बँका आहेत. या बँकांच्या विलीनीकरणातून जी एक बँक तयार होईल ती स्टेट बँकेनंतरची देशातील दुसरी मोठी बँक बनेल आणि तिची मालमत्ता 16.58 लाख कोटी असणार आहे.