मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ सध्या धमाल करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्यभूमिकेत आहेत. रोहित शेट्टीच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत असतात. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २० कोटीहुन अधिक कमाई केली होती.
आता ५ दिवसात ‘सिम्बा’ने १२४ कोटींची कमाई केली आहे. रोहित शेट्टीचा हा ८वा चित्रपट आहे, ज्याने १०० कोटींची कमाई केली आहे. रणवीर सिंगने याबाबतची पोस्ट आपल्या सोशल मेडिया अकाउंटवर शेअर केली आहे.