५ वर्षांचा चिमुकला पडला मुठा नदीत

0

पुणे-सायकल खेळता खेळता एक ५ वर्षांचा चिमुकला मुठा नदीत पडला. आज (बुधवार) दुपारी बारा वाजता शिवाजीनगर येथील सीओईपी कॉलेजजवळ ही घटना घडली. दरम्यान, मुलाचा शोध सुरू आहे. विराट काची (वय५ ), असे या चिमुकल्याचे नाव आहे. नदीपासून काही अंतरावरच विराटचे घर आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तो सायकल खेळत होता. उतारावरून त्याची सायकल थेट नदीपात्रात गेली. एका लहान मुलाने विराट पडल्याचे पाहिले आणि त्यानंतर कुटुंबीय नदीपात्रात धाव घेतली. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता नदीच्याकडेला त्याची सायकल आणि बूट आढळले. दरम्यान, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून चिमुकल्याचा शोध सुरू आहे.