५ हजार विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार

0

धुळे : क्रिडा भारती, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व सर्मथ वाग्देवता मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक सूर्यनमस्कार दिन शहरातील विविध शाळा व कार्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गंत एकूण ५ हजार विद्यार्थी व शिक्षकांनी सूर्यनमस्कार घातले. जागतिक सूर्यनमस्कार दिनाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार दि.३ ते १0 फेब्रुवारी या कालावधीत जागतिक सूर्यनमस्कार सप्ताह साजरा करण्यात आला. जागतिक सूर्यनमस्कार दिन कार्यक्रमासाठी क्रिडा भारतीतर्फे अध्यक्ष ओमप्रकाश खंडेलवाल, उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे, खजिनदार अतूल दहिवेलकर, मनोहर चौधरी, भिकाजी बोरसे, नरेंद्र मराठे व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.