७०० पेक्षा अधिक रेल्वे स्थानकावर वायफाय उपलब्ध होणार-रेल्वेमंत्री

0

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गुगलच्या सहकार्याने देशभरातील रेल्वे स्थानकांवर सुरू केलेली विनामूल्य वायफाय सुविधा आता ७०० पेक्षा अधिक स्थानकांवर उपलब्ध आहे. या सर्व स्थानकांत मिळून दरमहा तब्बल ८० लाख प्रवासी या सेवेचा उपयोग करतात, अशी माहिती रेल्वेने दिली आहे. ही सेवा जानेवारी २०१६मध्ये सुरू झाली. ही सेवा देणारे मुंबई सेंट्रल हे पहिले स्थानक ठरले. भविष्यात अशा स्थानकांची संख्या सहा हजारांवर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे.

जगातील आघाडीची सार्वजनिक वायफाय सुविधा असणार आहे. एकावेळी एका प्रवाशाला जास्तीत जास्त अर्धा तास वायफाय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. एका प्रवाशाकडून एका वेळी सरासरी ३५० एमबी डेटाचा वापर होईल, देशभरातील सर्व स्थानकांत मिळून दरमहा किमान सात हजार टेराबाइट डेटा खर्च होईल, देशातील २७ राज्यांत मिळून ४०७ शहरी तर २९८ ग्रामीण भागांतील स्थानकांत सेवा उपलब्ध असणार आहे.