मुंबई : कॉमेडीचा किंग कपिल शर्मा परतला आहे. मात्र या वेळी त्याच्या पाठीवर भाईजान म्हणजेच सलमान खानचा हाथ आहे. ‘द कपिल शर्मा शो’चा प्रोड्युसर सलमान खान आहे. अलिकडेच कपिलच्या शो मध्ये खान ब्रदर्सने हजेरी लावली होती. यात सलमानच्या लग्नावरून ‘भारत’ चित्रपटाचंही गुपित उलगडले आहे.
सलमान खानने अद्याप लग्न का केले नाही, असा प्रश्न कपिल त्याला विचारतो. याचं उत्तर देताना तो म्हणाला, की ‘भारत’ चित्रपटात मी ७२ वर्षाचा होईपर्यंत लग्न करत नाही, असे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे मी तोच नियम फॉलो करत आहे. यावर कपिलही मजेशीररित्या उत्तर देतो, की, स्क्रिप्ट तर आत्ता तयार झाली, आधी कुणाला फॉलो करत होता. त्याच्या या हजरजबाबी नंतर सेटवर हास्यकल्लोळ निर्माण झाला होता.