७२ हजार देण्याचे आश्वासन १५ लाखासारखे खोटे नाही:राहुल गांधी

0

आसामः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आसाममध्ये लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. गरीब जनतेला दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याच्या न्याय योजनेवरून मोदींनी केलेल्या टीकेलाही राहुल गांधींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. न्याय योजनेसाठी त्या चोरांच्या खिशातूनच पैसे येणार आहेत, ज्यांना मोदी वाचवत आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ईशान्य भारतावर हल्ला होऊ देणार नाही. एकीकडे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे मोदी सरकारने खोटे आश्वासन दिले, तर दुसरीकडे काँग्रेसने तुम्हाला 72 हजार रुपये देण्याचे खरे आश्वासन दिले आहे. भारतातल्या 20 टक्के गरीब लोकांच्या खात्यात काँग्रेस पाच वर्षांत 3 लाख 60 हजार रुपये खात्रीशीररीत्या जमा करणार आहे. मोदींनी पाच वर्षांत कोट्यवधी लोकांना बेरोजगार केले आहे.

आज झालेल्या प्रचारसभेत त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपावर निशाणा साधला आहे. नागरिकत्व विधेयक कधीही मंजूर होऊ देणार नाही.

सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी मोठ-मोठी आश्वासने दिली होती. परंतु त्यातील कोणतंही आश्वासन मोदींनी पूर्ण केलेले आहे काय?, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याच्या आश्वासनाची अद्यापही पूर्ती केलेली नाही. आमचं सरकार सत्तेवर आल्यास महिन्याकाठी 12 हजारांहून कमी उत्पन्न असलेल्या लोकांची एक यादी तयार केली जाईल, त्या सर्वांच्या खात्यात काँग्रेस सरकार 72 हजार जमा करणार आहे. देशातील लाखो तरुण व्यवसाय सुरू करू इच्छितात. परंतु त्यासाठी सद्यस्थितीतील सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु आमचं सरकार आल्यावर कोणालाही व्यवसाय करायचा असल्यास परवानगी घेण्याची गरज लागणार नाही असे राहुल गांधींनी सांगितले.