८-१० जागा मिळवणारे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहत आहे: मोदी

0

चंदोली: ज्या पक्षांच्या ८-१०, २०-२२ जागा निवडून येतात असे पक्षदेखील आता पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहू लागले आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. आज लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होत असलेल्या उत्तर प्रदेश मधील प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी महाआघाडीवर निशाना साधत अनेक नेत्याना लक्ष केले. स्वप्न पाहने चुकीचे नाही. पण या निवडणुकीत लोकांनी मोदी सरकार येणार हे ठरवले आहे, असेही ते म्हणाले. देशाला स्थिर सरकार कसे देणार याचे उत्तर अजून विरोधकांकडे नसून, महाआघाडी मिलावट आहे असेही ते म्हणाले.

देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या फुटीरतावाद्याना कठोरपणे सरकारने हाताळले आहे. तसेच दहशतवाद्याच्या मुद्द्यावर सरकारी धोरण स्पष्ट असून, दहशतवाद्याना घरात घुसून मारू या शब्दाचा पुनरुच्चार त्यांनी केला. वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र उभारण्यात आलं असून, त्याचा फायदा चांगल बियाणे निवडण्यासाठी, तसेच पिकाची काळजी घेण्यासाठी मदत होईल असेही मोदी म्हणाले.