जळगाव : मविप्रत दोन गटात झालेल्या वादातून शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुरन ९९/१८ अन्वये दाखल गुन्ह्यातील ॲड.विजय पाटील यांच्यासह दहा जणांनी जामीन मिळावा ,यासाठी न्यायालयात वेगवेगळे अर्ज सादर केले आहेत. कोर्टाने खुलासा मागविल्यावर सरकार पक्षाने तो सादर केला असून अर्जावर सुनावणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.
तर मविप्र संदर्भात गुरन ९७/१८ अन्वये दाखल गुन्हयात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी मनोहर पाटील , आनंदा कापसे यांच्यासह इतरांनी अर्ज सादर केले असून त्यावरही दि. ३० रोजी कामकाज होणार आहे. या अर्जावरदेखील सरकारपक्षाने खुलासा सादर केला आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी तर बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश बी.पाटील हे कामकाज पाहत आहेत.
हेमंत साळुंखे यांच्या अर्जावर हरकत
मविप्रप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीतील संचालक हेमंतकुमार साळुंखे यांनी नियमीत जामीन
मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्या. ठुसे यांच्या न्यायालयात या अर्जावर सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेल्या खुलाश्यास हरकत घेण्यात आली आहे. या प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी अंतीम युक्तीवाद होणार आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी तर बचाव पक्षातर्फे ज्येष्ठ विधीज्ञ प्रकाश बी. पाटील हे कामकाज पाहत आहेत.