​खांडगे स्कूलमध्ये अनोख्या उपक्रमांनी ‘पर्यावरण दिन साजरा

0

तळेगाव : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तसेच पिंपरी-चिचंवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित तळेगाव येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘पर्यावरण दिवस’ हा प्रभातफेरी व कागदी पिशव्याच्या वितरण करून साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची सेवाधाम हॉस्पिटल, तसेच स्टेशन परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी अनेक घोषवाक्याचा जयघोष करत विद्यार्थ्यानी ‘झाडांचे महत्त्व’ सांगितले. प्लास्टिकचा वापर करणे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. लोकांनी प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळावा त्या ऐवजी कागदी पिशव्याचा वापर करावा. यासाठी शाळेतील ‘स्काउट’ च्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यानी दोन हजार कागदी पिशव्या तयार केल्या होत्या.

यासाठी स्टेशन परिसरातील दुकानादारांना शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ‘कागदी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून शाळेने ‘गो ग्रीन टुगेदर’ चा महत्त्वपूर्ण संदेश दिला. तसेच ‘थ्री -आर’ ‘प्लास्टिक निर्बंध व योग्य पुनर्वापर’ या तत्वाचा अवलंब सर्वांनी करावा, असे आवाहन केले. विद्यार्थिनी विशाखा यादव हिच्या प्रस्तावनेतून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिक्षिका नम्रता परदेशी यांनी पर्यावरणावर आधारित कवितेचे सादरीकरण केले. तसेच, ‘प्लास्टिकच्या वापर बंद करू’ अशी सर्वांनी प्रतिज्ञा केली. तर, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली गुरव यांनी मार्गदर्शन केले. यशश्री आलम, युनूस पटेल यांनी संयोजन केले.