अँगल घेतल्याशिवाय चुंबन देता येत नाही!

0

नवी दिल्ली । चुंबन घेताना किंवा देताना अँगल हा लागतोच. त्याशिवाय चुंबन क्रिया होऊ शकत नाही, असे बांगलादेशातील मेंदूच्या अभ्यासकांनी आणि मनोवैज्ञानिकांनी म्हटले आहे. चुंबन घेणे म्हणजे एकमेकांचे चेहेरे आणि ओठ सरळ रेषेत समोरासमोर आणून केली जाणारी क्रिया नाही. चुंबन घेणारा उजवीकडे डोके वाकवतो आणि चुंबन देणारा स्वतःला त्या कोनांमध्ये स्थिर करतो, असा संशोधन अहवाल बांगलादेशातील मेंदूच्या अभ्यासकांनी आणि मनोवैज्ञानिकांनी समोर आणला आहे. स्त्रियांपेक्षा 15 पट पुरुषांनी चुंबन घेण्यात पुढाकार घेतला. ते घेताना दोघांनीही उजव्या बाजूला झुकण्याचा प्रयत्न केला, असे डॉ. रिझाउल करीम यांनी म्हटले.

48 जोडप्यांचा केला अभ्यास
ढाका विद्यापीठ, बाथ, आणि बाथ स्पा यांनी चुंबनावरील हे चेतामानसशास्त्रीय संशोधन केले.
त्यात जोडीदाराचे डोके ज्या दिशेला वळते तिकडे चुंबन घेणारा वळतो, असे मांडण्यात आले आहे. सायंटिफिक रिपोर्ट या जर्नलमध्ये चुंबन अभ्यास प्रसिद्ध करण्यापूर्वी बांगलादेशातील 48 जोडप्यांचा अभ्यास करण्यात आला.