यावल। तालुक्यातील मारुळ येथील अँग्लो उर्दू हायस्कुलचे मुख्याध्यापक सैय्यद इमरान अखतर मुमताज अली यांना बेशिस्तपणामुळे निलंबीत करण्यात आले आहे. यासंदर्भात निलंबनाची नोटीस संस्थेतर्फे अली यांना देण्यात आली आहे.
संस्थेच्या अंतर्गत व्यवहारात दखल दिल्याने कारवाई
मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतांना शैक्षणिक कार्य सोडून संस्थेच्या अंतर्गत व्यवहाराबाबत व संस्थेतील दोन गटामध्ये भानगडी लावून संस्थेचे नाव बदनाम करणे, संस्थेच्या पदाधिकार्यांना अंधारात ठेवून शिक्षक भरतीच्या जाहिराती देवून स्वत:च्या भावाला आदेश दिलेली आहे. हे कृत्य बेशिस्तपणाचे व बेजबाबदारपणाचे आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.