अँटी कृष्ण पथक असे ठेवणार का?

0

नवी दिल्ली । प्रशांत भूषण यांनी ट्विटरवरुन अँटी रोमिओ पथकावर टीका केली. त्यांनी श्रीकृष्णाचे नाव आणल्याने वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशात अँटी रोमिओ पथकाने काही प्रेमी युगूलांवरही कारवाई केल्याने हे पथक वादात सापडले प्रशांत भूषण यांनी रोमिओने फक्त एका महिलेवरच प्रेम केले. तर प्रभू श्रीकृष्ण हे छेड काढण्यासाठी ओळखले जायचे. मग आता आदित्यनाथ या पथकाचे नाव अँटी कृष्ण पथक असे ठेवणार का सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजप प्रवक्त्याचे प्रत्यूत्तर
प्रशांत भूषण यांचे हे ट्विट वादाचा विषय ठरला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटरवरुन या विधानावर नाराजी व्यक्त केली. श्रीकृष्णांना समजून घेण्यासाठी त्यांना खूप जन्म घ्यावे लागतील असे त्यांनी सांगितले. इतक्या सहजपणे तुम्ही श्रीकृष्णालाही राजकारणात खेचले. ही दुःखद बाब आहे असे संबित पात्रा म्हणाले. अनेकांनी प्रशांत भूषण यांच्या ट्विटवर आक्षेप घेतला. तुमच्या कोर्टात श्रीकृष्ण छेड काढणारे असतील, पण अनेकांच्या मनात ते आस्थेचा विषय आहे असे एका युजरने म्हटले आहे.

विश्वास यांनीही निशाणा साधला
आम आदमी पक्षाचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनीही अँटी रोमिओ पथकावर निशाणा साधला आहे. लखनौमध्ये कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी कवितांच्या माध्यातून या पथकाची खिल्ली उडवली. हे पथक आधी असते तर त्यांनी राधा-कृष्णालाही तुरुंगात पाठवले असते असा टोला कुमार विश्वास यांनी लगावला.