मुंबई: बॉलीवूडचा अभिनेता सुनील शेट्टी याची राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा)च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या खेळातील खेळाडूंना मादक आणि उत्तेजित करणाऱ्या पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी ही एजन्सी काम करत असते. खेळाडूंची डोपिंगपासून दूर ठेवण्यासाठी ही एजन्सी जनजागृती करत असते.