अँड्रॉइड युझर्सना फोटो फिल्टरची प्रतिक्षा

0

व्हॉटस अप मिडिया शेअरींगसारखी अनेक फिचर्स ग्राहकांसाठी असते. एक लक्षणीय फिचर म्हणून फोटो फिल्टरकडे पहाता येते. आयफोन युझर्स जुनपासून या सुविधेचा फायदा घेत आहेत पण अँड्रॉइड असलेल्यांना मात्र या सुविधेचा फायदा मिळत नाही. आता लवकरच त्यांना फोटो फिल्टर मिळणार आहे.

व्हॉटस अप अँड्रॉईड बिटा व्हर्जन २.१७.२९७ मध्ये ते दिसत होते पण २.१७.२९८ मध्ये ते काढल्याचे दिसले. मात्र मोशे इने अँड्रॉइड बिटा एप वर चालणाऱ्या फिचरच्या इमेज शेअर केल्या आहेत.

बिटा मोडमध्ये आय फोन प्रमाणेच हे फिचर चालले. व्हॉटस अपवर जाऊन इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप चॅटवर जायचे. कुणाला मिडिया पाठवायचा तेथे जाऊन स्वाईप केल्यावर पॉप, बी अँड डब्ल्यू, कूल, फिल्म आणि क्रोम असे फिल्टर येतील. हे फिचर नव्या व्हॉटस एप व्हर्जनमध्ये नाही. परंतु ते आयओएस एपमध्ये आहे. त्यासाठी धीर धरावा लागेल पण फोटो फिल्टर हवा असेल तर एपीके मिरर फॉर व्हॉटस एप व्हर्जन २.१७.२९७ डाउनलोड करा आणि गुगल प्ले वरून एप अपडेटिंग थांबवा.