अँड्रॉईड फोनमध्येही येणार काळोखात शूट करणारा आयआर कॅमेरा

0

क्वालकॉम कंपनीकडून एन्ड्रोईड फोनमध्ये कॅमरा, व्हिडिओ यांच्यामध्ये इन्फ्रारेड सुविधा आणणार आहे. यामुळे काळोखातले शुटिंगही अगदी स्पष्ट होणार आहे. त्यासाठी एक वर्ष थांबावे लागणार आहे. कंपनी स्नॅपड्रॅगन प्रोसेसर वापरणार आहे. त्यातील स्पेक्ट्रा या इमेज सिग्नल प्रोसेसरमध्ये बदल करणार आहे. झटकन प्रतिमा शोधणारे सेन्सर स्नॅपमध्ये असणार आहेत. गेल्या वर्षी क्वालकॉमने स्पेक्ट्रा मोड्युल प्रोग्राम तयार केला होता.

दुसऱ्या जनरेशनमधील स्पेक्ट्रा इमेज प्रोसेसर क्वालकॉम तीन प्रकारे उपयुक्त आहे. एक स्कॅनिंग, दुसरा सेन्सिंग आणि तिसरा म्हणजे डीप सेन्सिंग. यात आवाजातील व्यत्यय व अडथळे, व्हिडिओची स्थिरता अशा सुधारणाही त्यात केलेल्या आहेत. सॅमसंगचा गॅलेक्सी एस ८ मधील आयरिस स्कॅनर तसा सर्वांनाच माहित आहे. क्वालकॉमच्या मते त्यांचा इमेज प्रोसेसर जास्त परीणामकारक आहे.