नंदुरबार। ब र्हाणपूर -अंकलेशवर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता रोको आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती,आंदोलनाच्या दुसर्या दिवशी तिव्रता दिसून आल्याने बाजार पेठेवर परिणाम दिसून आला. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी नंदुरबारला कांद्याचा ट्रक रस्त्यावर फेकून शासणाचा निषेध नोंदवला गेला. काल दुसर्या दिवशी ही बाजार पेठेत कमालीचा शुकशुकाट होता. त्यामुळे भाजीपाला , दूध आदी वस्तू महागड्या कींमातीने घेण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. काल प्रकाशा येथे शेतकर्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. गुजरात राज्यात जाणार्या शेतीमालाच्या गाड्या रोखल्यात आल्या होत्या. म्हणून गुजरात राज्यात भाजीपाला पोहचू शकला नाही. शेतकर्यांचे आंदोलन चिघळत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरात नासधून न करता शांततेत आंदोलन
शहाद्यात आज पहाटेस चार वाजता भाजीमार्केटमध्ये लिलाव प्रसंगी केवळ 6 गाड्या आल्या होत्या. ज्या रोज 20 ते 22 येत असतात परिणामी असंख्य भाजीपाला विक्रेत्यांना भाजीपाला भाजीपाला मिळाला नाही. शहरात हाथ गाडीवाले देखील दिसले नाही. कृष्णाउत्पन्न बाजारात समिती आवारात एकही वाहन येउ शकले नाही. हमाल वर्ग काम नसल्याने बाजारसमितीच्या शेड मधील विश्रांती करत होते. शेतकरी शहरी भागात फिरकला नाही. खेतीया रस्ता तळोदा जवळील आमलाड रस्ता म्हसावद रस्ता, धूळपाटी रस्त्यावर कोणतेही शेतीमाल भरलेले वाहन जाउ दिले नाही. शेतकर्यांनी आपापल्या शेताजवळ केळी,पपईंनी भरलेल्या गाड्यां थांबून ठेवल्या आहेत. सुतगिरणीजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शहादा तालुक्यातील शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, उस उत्पादक व केळी उत्पादक संघटना, शेतकर्यांचा संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त बागायत शेती शहादा तालुक्यात असल्याने तालुक्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. शहरात कोणत्याही प्रकारची नासधूस न होता आंदोलन शांततेत सुरु आहे.
गाड्यांच्या चाकांची काढली हवा
शहादा शहरात साक्री जळगाव सटाणा इंदोर भागातून भाजीपाला येतो सर्वात जास्त भाजीपाला हा साक्रीभागाकडच्या असतो. शेतकर्यांनी मुख्यमार्गावर गाड्या अडविल्याने भाजीपाला शहरापर्यंत पोहचु शकला नाही. विशेष म्हणजे असंख गाड्यांच्या चाकातील हवा काढल्याची माहिती ज्या काही गाड्या शहाद्यात दाखल झाल्या त्या गाड्यांच्या चालकांनी दिली. कमालीची दशहत निर्माण झाल्याने व गाड्यांची होणारी तोडफोड लक्ष्यात घेता उद्या दिं 3 जून रोजी 100% भाजीपाल्याची वाहतूक करणार्या गाड्या बंद राहतील अशी माहिती मिळाली.
शहाद्यात व्यवहार ठप्प
शहादा । शहरासह परिसरात काल गुरूवारपासून सुरु झालेल्या शेतकर्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प झाले असून तालुक्यातील शेतकरी आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाला आहे. आज रोजी शहादा शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये शुकशुकाट होता. भाजीपाल्याचा गाड्या न पोहचल्याने भाजीपाला विक्रेते हताश होऊन बसले होते. नेहमीप्रमाणे पहाटेपासून भाजीपाला मार्केटमध्ये असणारी वर्दळ केवळ 20 ते 25% च होती.