मुंबई : ‘पवित्रा रिश्ता’ या शो मधून फेमस झालेली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अंकिता काही वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनमध्ये होती मात्र काही कारणांमुळे हे दोघे विभक्त झाले.त्या नंतर ती विकी जेनला डेट करू लागली.
आता अंकिताने अद्यापही विकीसोबतच्या नात्याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही. अशात तिला याबद्दल प्रश्न विचारला असता, विकी एक खूप चांगला मुलगा आहे. तो एक व्यावसायिक आहे. होय मी प्रेमात आहे आणि वेळ आल्यावर सर्वांना याबद्दलची माहिती नक्कीच देईल, असे उत्तर अंकिताने दिले आहे. सध्या लग्नाविषयी काय विचार आहे? असे विचारले असता, याबद्दल विचार करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेल. सध्या मी माझ्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. लग्न ही गोष्ट माझ्या आयुष्यात खरंच महत्त्वाची आहे. आणि योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच याबद्दल कळवेल, असेही अंकिताने यावेळी सांगितले.