अंकिता, कामरान यांच्यासमोर बिनमानांकित प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान

0

मुंबई । एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए यूएस डॉलर 125,000 सिरीज स्पर्धेत भारताला चार वाईल्ड कार्ड देण्यात आले. त्यामध्ये भारताची आघाडीची महिला खेळाडू अंकिता रैना बिनमानांकित रशियाच्या वेरोनिका कुदरमेटोवा हिच्याशी पहिल्या फेरीत सामना करेल. दरम्यान, 19 वर्षीय या करमन कौर थंडी ही दुसरी मानांकित भारतीय खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत 312 स्थानी असलेली ती स्लोव्हेनियाच्या 26 वर्षीय दलीला जाकूपोविक ( जागतिक क्रमवारी 242) हिचा पहिल्या फेरीत सामना करेल. तर, महाराष्ट्रची 21 वर्षीय ऋतुजा भोसले ( 604 क्रमवारी) पहिल्या फेरीत 23 वर्षीय क्वालिफायर व क्रमवारीत 274 व्या स्थानी असलेल्या इस्राएलच्या डेनिझ खाजानीउक हिचा सामना करेल. इस्राएलच्या या खेळाडूने शनिवारी आणि रविवारी आपले पात्रता फेरीतील सामने जिंकत मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. 18 वर्षीय झील देसाई ही वाईल्ड कार्ड मिळवणारी चौथी भारतीय ठरली.

जागतिक क्रमवारीत 790 व्या स्थानावर असलेली झिल समोर सातव्या मानांकित व जागतिक क्रमवारीत 150 व्या स्थानावर असलेल्या 22 वर्षीय कॅनडाच्या कॅरल झाओशी होणार आहे. मी दुहेरीत वेनोनिकाशी गेल्यावर्षी खेळलेली आहे. पण, मला जसे खेळायचे तसे खेळण्याची संधी आहे. त्यामुळे पहिली फेरी अतिशय चांगली होईल, असे अहमदाबादची अंकिता हिने ड्रॉची घोषणा झाल्यानंतर सांगितले. भारतामध्ये इतक्या मोठ्या स्तराची स्पर्धा होत असल्याने मी अतिशय आनंदी आहे. मी प्रत्येक सामन्याला समोर ठेवून माझा खेळ करेन. मी गेली दोन आठवडे चीन व जपानमध्ये खेळले. त्यामुळे या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा मला विश्‍वास आहे असे रैना पुढे म्हणाली.