अंकुर धामा ठाण्यात धावणार

0

ठाणे । आशियाई पदक विजेता अंध धावपटू स्वांतत्र्यदिनी ठाणे शहरात आयोजित केलेल्या आय रनमध्ये धावणार आहे. आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने सेठ ग्रुपने आयोजित केलेल्या या शर्यतीत अंकुर 10 किलो मीटर अंतराच्या शर्यतीत सहभागी होणार आहे.

भारतात नेत्रदानाचा प्रचार करण्यासाठी सेठ ग्रुपतर्फे या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलपासून सुरू होणार्‍या या शर्यतीत 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर असे दोन गट असणार आहे याशिवाय उत्साही मुलांसाठी एक मैल अंतर धावण्याची स्पर्धा असणार आहे. उत्तर प्रदेशातील बाघपत जिल्हातील अंकुरची वयाच्या पाचव्या वर्षी दृष्टी गेली. दिल्लीच्या जेपीएम सेकंडरी स्कुल ऑफ ब्लाईंडमध्ये असताना त्याने अंधाच्या स्पर्धांंमध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली.