अंगणवाडी कर्मचारी संघटनेने मानले शासनाचे आभार

0
खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेऊन केले अभिनंदन
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केल्याने अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाचे आभार मानले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना पनवेलतर्फे आज खासदार रक्षाताई खडसे यांची कोथळी येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही भेट घेतली.  शिष्टमंडळात सविता महाजन, चेतना गवळी, सरला कोलते, भारती पाटील, जया पाटील, अलका पाटील, वैशाली निंभोरे, सुवर्णा पाटील, वैशाली कोळी, शोभा वारके आदींचा सहभाग होता.