जळगाव । राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांना अन्य राज्यातील मिळणार्या मानधनाच्या धर्तीवर मानधन वाढ करावी. तसेच मानधन वाढीबाबत ना. पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी. यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी आपआपल्या जिल्हा परिवारांवर अंगणवाडी मोर्चे काढले. परंतु शासनाने मानधन वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. म्हणून अंगणवाडी कर्मचारी 4 ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी महामोर्चा काढणार आहेत. महामोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी अमृतसर-दादर या गाडीने निघायचे आहे. तरी मोठ्या संख्येने भागीदारी करून महामोर्चा यशस्वी करावा. असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील आणि युवराज बैसाने यांनी केले आहे.