जळगाव । विविध मागण्यांसह इतर जिल्हास्तरीय प्रश्नांकडे जिल्हा परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी दि. 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता संघटनेचे प्रतिनिधी धरणे आंदोलन करणार आहेत. तरी सदर धरणे आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकांन्वये केले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्यांना जून 2017 पासूनचे थकीत मानधन देण्यात यावे. अंगणवाडी केंद्रासाठी लागणारी स्टेशनरी व दप्तर पुरविण्यात यावे. अंगणवाडी सेविकांकडून दप्तरासाठी 600 ते 800 रुपये येणार्या मुख्यसेविका व प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
पीएफएमएस सुविधा द्या
अमळनेर, पारोळा, यावल, रावेर, पाचोरा या प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांकडून घेतलेले 600 ते 800 रुपये विनाविलंब परत करण्यात यावे. सेविकांच्या रिक्त जागा पात्र व अनुभवी मदतनिसांकडून ताबडतोब भरण्यात याव्यात. पीएफएमएसमार्फत दरमहा वेळेवर मानधन अदा करण्यात यावे. अशा मागण्या कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी कळविले आहे.