अंगणवाडी बचतगटांना खाऊची थकित बिले मिळण्याची मागणी

0

चोपडा । तालुक्यात अंगणवाड्यातील खाऊ शिजवणारे बचत गटांना गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्र शासनाने बिले दिले नसल्याने रोजचा सूमारे 30 ते 60 बालकांचा खाऊसाठी पैसा कसा उपलब्ध करावा हा एक प्रश्‍न बचत गट खाऊ शिजवणार्‍या महिलांना पडला आहे. म्हणून येत्या 27 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजेपासून चोपडा तहसील कार्यालयासमोर जळगाव जिल्हा आयटकतर्फे करण्याचा इशारा बचत गट संघटना यांनी दिला आहे.

खेडोपाडी गोरगरिब महिलांनी बचत गट स्थापन कले असून त्यांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून अंगणवाडी चा खाऊ शिजवणेचेही कामे दिली आहेत. प्रत्येक बालकामागे खाऊ शिजवण्याचा दर रूपये मिळत आहे. त्यात एप्रिल 2017 पासून त्यात 2 रूपयांनी वाढ झाली. मात्र मार्च 2017 पासून बिलेच मिळाली नसल्याने खाऊ शिजवणार्‍या गटांना सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून सवलतीचे दरात तांदूळ गहू, साखर, केरोसिन, गॅस, मिळायला हवा पण तेही उपलब्ध करून दिले जात नाही. शेतकर्‍यांची उद्योजकांची कर्ज माफीत गोरगरिब महिलांचे बचत गटांच्या कर्जमाफीचाही विचार व्हायला हवा म्हणून सोमवारी चोपडा तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. खाऊ शिजवण्याचा सहा रूपयांवरून 8 रूपये दर वाढवून दिल्यानंतरही अद्यापर्यंत त्याचा कोणताही मोबदला मिळाला नसल्यानेती बीले मिळावीत या खाऊ शिजवणार्‍या गटांना सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून सवलतीचे दरात तांदूळ गहू, साखर, केरोसिन, गॅस, मिळायला हवा, तसेच महिलांचे बचत गटांच्या कर्जमाफी करा दर बालकामागे दहा रूपये मिळावेत या मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपक गिरासे व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदने देण्यात आले.

आंदोलनात यांचा सहभाग
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. अमृत महाजन यांनी केले. त्यावेळी मिना नेवे, सरूबाई कोळी, जयश्री महाजन, मीनाक्षी सोनवणे, माया माळ, समरा पावरा, मिराबाई गिरासे, उषाबाई पावरा, शोभाबाई सोनवणे, शांताराम पाटील, गोरख वानखेडे यांच्यासह तालुक्यातील खाऊ शिजवणारे बचत गट व संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. दरम्यान येत्या 3 डिसेंबर रोजी पुढीत बैठक पंचायत समितीसमोर आयोजन करण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आवाहन करूनही उपयोग होत नसल्याचा आरोप केला.