पुणे : महापालिकेच्या शाळेतील बालवाडी शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविकांना पगारवाढ देण्याची अट गुरुवारी मुख्य सभेत बदलण्यात आली. स्थायी समितीने ठेवलेली 15 वर्षांची अट मुख्यसभेने दहा वर्षे केली. अधिकाधिक शिक्षिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच सहा महिन्यांची प्रसूती रजाही देण्याची उपसूचना मान्य करण्यात आली.
अंगणवाडी सेविकांचे धोरण प्रशासनाने तयार केले आहे. या धोरणाला मान्यता देताना 15 वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेले व कमी सेवा झालेले असे दोन स्तर तयार केले होते. मुख्यसभेत हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आला होता. त्यामुळे 10 वर्षांहून कमी सेवा झालेल्या बालवाडी शिक्षिकांना दहा हजार व सेविकांना साडेसात हजार मानधन मिळणार आहे.10 वर्षांहून अधिक सेवा झालेल्या शिक्षिकांना 11,500 रुपये आणि सेविकांना 8,500 मानधन मिळणार आहे. तसेच प्रत्येक दोन वर्षांनी यामध्ये 10 टक्के दरवाढ देण्यात येणार आहे.