अंगणवाडी सेविका वर्कर नव्हे तर ‘हार्डवर्कर’आहे

0

जळगाव । अंगणवाडी सेविका या वर्कर आहे असे मी म्हणणार नाही तर हार्डवर्कर आहे असे म्हणेल़ मात्र, त्यांनी स्वताच्या सुरक्षिततेसाठी निर्णय घ्यायला हवे़ कारण सेवतून मिळत असलेले मानधन कसे खर्च करावे याचा निर्णय स्वता घेतला तरच खजया अर्थाने सक्षम व्हाल असे प्रतिपादन जिल्हाधीकारी रुबल अग्रवाल यांनी केले़ महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्यावतीने गुरुवारी किशोरवयीन मुलींचे व महिलांचे जेन्डर व आरोग्य कायदे विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते़ याप्रसंगी त्या बोलत होत्या़

कांताई सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार तसेच दिपप्रज्वल करुन सुरवात करण्यात आली. कानळदा येथील साई गृपचे सपकाळे यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी आईच्या महतीवर सहनशील तू, मननशील तू, कृतीशील तू असे गीत सादर करुन उपस्थीतांच्या टाळ्यांची दाद मिळविली़ यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधीकारी रुबल अग्रवाल होत्या़ व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडे्य, महिला व बालविकास अधिकारी सचिन दुसाने हे उपस्थीत होते़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा काळे यांनी केले़ याप्रसंगी ज़िप़चे सीईओ पांडे म्हणाले की, अंगणवाडी सेविका या समाजाचे प्रतिनिधीत्व करतात, या सेवतून मिळालेले पैसे कसे खर्च करायचे अर्थातच निर्णय घेण्याची क्षमता वाढविली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

भेदभाव थांबवा…

अध्यक्षीय भाषणात जिल्हाधीकारी रुबल अग्रवाल पुढे म्हणाल्या की, जेंडरमधील फरकाला विशेष महत्व आपण देतो, अर्थातच घरातील मुलाला जादा महत्व आणि मुलीला कमी असा भेदभाव केला जातो़, हे थांबायला पाहिजे़ जिल्ह्यात सर्व अंगणवाडी सेविका आपली सेवा देतात मात्र मिळालेल्या मोबदला स्वतासाठी न खर्चता मुलासाठी नवजयासाठी देतात़ जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्ही सक्षम आहात असं म्हणता येणार नाही़