जळगाव । जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका मदतनीसांना गेल्या फेब्रुवारी 2017 पासून मानधन मिळालेला नाही. टी.ए. बीले मिळालेले नाहीत. लहान मुलांच्या खाऊसाठीचा खर्च सेविकांना करावा लागतो. दारिद्य्र रेषेखालील महिलांचे बचत गट खाऊ शिजवतात. त्यांना यावर्षी निधी मिळालेला नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे. सेविका मदतनीस बचत गटांचे आर्थिक नुसान होत आहे. या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले. एकुण दहा 10 मागणी अंगणवाडी कर्मचारींनी केली आहे. मागणी मान्य न केल्यास 1 जूलै पासून बालकांना पुरविला जाणारा पोषण आहार बंद केले जाईल. 15 जूलै पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी कॉ.अमृतराव महाजन, मिना काटोले, विद्या पाटील, वत्सला पाटील, शशिकला निंबाळकर, जिजाबाई राणे, राजपूत, वंदना पाटील, सरुबाई कोळी आदी उपस्थित होते. शिष्टमंडळात सुनंदा कदम, शोभा पाटील, शारदा पाटील, सुमित्रा बोरसे, रजना मगरे, रजनी पाटील, अश्विनी देशमुख, छाया माळी, निर्मला महाजन आदींचा समावेश होता.